वार्ताहर/ सांबरा :
संपूर्ण गावातून तसेच कंचवीरनगर, पाटीलनगर, प्रभावतीनगर, लक्ष्मीनगर, व्यंकटेशनगर, दत्तनगर व शिवाजीनगर या उपनगरामधून लोकवर्गणीतून पंतप्रधान कोरोना निवारण फंडासाठी जमा केलेले 60 हजार 197 रुपये रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे रविवारी सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी येसाजी संभाजीचे, एन. डी. बंडाचे, शामराव पाटील, उमेश पुरी, बाळाराम चौगुले, आप्पाण्णा चौगुले, गजानन बिरादार, तुकाराम पाटील, हेमंत पाटील, किसन चौगुले, विनायक पुरी, प्रशांत साळुंखे, अशोक बस्सापूरे, अनिल पुजेरी, सुनिल केदार, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, शिरीष पाटील, राकेश गिरी, युवराज जाधव, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.









