ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी अमेरिकेत बनवण्यात आलेले ‘एअर इंडिया वन’ हे व्हीआयपी विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.
भारत सरकारने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग 777-300 ई आर विमान तयार आहे. या एअर इंडिया वन विमानामध्ये सिक्योर कम्युनिकेशन सिस्टीम लावण्यात आली आहे. ही विमाने पूर्णपणे एअर कमांड च्या रुपात काम करतात. या विमानांच्या आधुनिक ऑडियो व्हिडिओ प्रणालीला टेप किंवा हॅक करता येत नाही.
एअर इंडिया विमानात मिसाईल डिफेन्स सिस्टीम त्यासोबतच सेल्फ प्रोटेक्शन सूट आहे. तसेच या विमानात एक कॉन्फरन्स रूम, एक मेडिकल सेंटर तसेच एक केबिन देखील असणार आहे.
यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या साठी असेल. तसेच या विमानावर एअर इंडिया वन ची खास साईन असणार आहे. या साईनचा अर्थ विमानातून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान प्रवास करत आहे, असा असेल. तसेच विशेष म्हणजे या विमानावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक चक्रासह भारत आणि इंडिया असे लिहिलेले असेल.