ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महारॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, वायनाडच्या कलपेटा येथून सुरु झालेल्या या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकत्यानी सहभाग घेतला होता.
या मार्चनंतर उपस्थितांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधरा आहे. यात फारसे अंतर नाही. परंतु, मी गोडसे यांचा भक्त आहे, असे बोलण्याची नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत नाही.
पुढे ते म्हणाले, ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि नोकऱयाविषयी विचारले तर ते लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरा मुद्दा बोलतात. तसेच मी भारतीय आहे, यासाठी कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे. कोण भारतीय आहे. व कोण भारतीय नाही, हे सांगण्यापर्यंत नरेंद्र मोदी कोण आहेत.









