नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी देशातील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱया कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर उपस्थित राहणार आहेत. शेतकऱयांच्या कल्याणासाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या विविध सुधारणांवर शेतकरी स्वतःचे अनुभव मांडणार आहेत. याचवेळी ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जाहीर करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नऊ कोटी लाभार्थी शेतकऱयांना 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविण्यास परवानगी देतील. यावेळी 6 राज्यांतील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









