म्हैसूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबरला म्हैसूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास भाषण करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू जी. हेमंत कुमार यांनी दिली. यूओएमच्या मते, विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ पहिल्यांदा म्हणजे १९ ऑक्टोबर रोजी त्याच दिवशी होणार आहे. पहिला दीक्षांत समारोह १९ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला होता.
दरम्यान, यूओएम इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करणार आहे. विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सुधा मूर्ती यांना पदवी देण्यास मान्यता दिली आहे, असे कुलगुरू हेमंत कुमार यांनी म्हंटले आहे.

युओएमचा शताब्दी दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरातील क्रॉफर्ड हॉलमध्ये होईल. हा दीक्षांत समारंभ याआधी १५ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता पण कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला होता.









