बेंगळूर/प्रतिनिधी
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी चर्चेदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यापुढे बेंगळूरची वाढती कोरोना संख्या चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे.
बेंगळूरमध्ये बुधवारी ४,९९१ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि २५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोरोनाची वाढती संख्या चिंताजन आहे. कोविड प्रकरणे वाढत असताना बेंगळूर पोलिसांनी बुधवारी बेंगळुरू शहरात सीआरपीसी कलम १४४ (१) लागू केलं आहे.
दरम्यान बेंगळूर येथील कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आजपासून शहराच्या हद्दीत कलम १४४ (१) सीआरपीसी लागू करण्यात आल्याची माहिती बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी जारी केलेल्या आदेशात दिली.
सीआरपीसीचा कलम १४४(१) कोणत्याही व्यक्तीला “मानवी जीवनाचा धोका, आरोग्य किंवा सुरक्षितता किंवा सार्वजनिक शांततेत अडथळा येऊ नये म्हणून” एखाद्या विशिष्ट कृतीपासून दूर राहण्याचे निर्देश सरकारला देते.









