मुंबई/प्रतिनिधी
सत्ताधाऱ्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात असताना आता संजय राऊतांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा त्यांनी केला आहेर. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या विषयावर मतभेद असू शकता पण नाराजी नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज याविषयीच्या चर्चेला अर्थ नाही, असे राऊत म्हणाले. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरू आहे’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच, पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांच्या नाराजीच्या चर्चेनंतर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे शरद पवार नाराज आहेत की नाहीत हे भेटीनंतर समजेल.
दरम्यान, मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे. तसंच, ईडीकडून अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांच्या चौकशीवर भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्वकाही व्यवस्थित आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. पण केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. तीन वेगवेगळे पक्ष असल्यामुळे थोडे फार मतभेद होतीलच. पण, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात. पण नाराज कुणीच नाही, विरोधी पक्षाला हवे असलेले घडत नाही, त्यामुळे अफवा पसरवल्या जात आहे, असंही राऊत म्हणाले.