भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ: डेऱयाचे एक लाखांहून अधिक अनुयायी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नवी दिल्लीत पंजाबच्या व्यास येथील राधा स्वामी सत्संग डेऱयाचे मुखी बाबा गुरिंदर सिंह ढिल्लों यांची भेट घेतली आहे. मोदींची डेरा व्यासच्या प्रमुखांसोबतही ही भेट त्यांच्या पंजाबमधील पहिल्या जाहीर सभेच्या एक दिवस अगोदर झाली आहे. या भेटीचे राजकीय अर्थ काढले जत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अमृतसरमध्ये अकाल तख्त जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांची भेट घेतली आहे.
पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री स्वतःच्या ट्विटर अकौंटवरून राधा स्वामी सत्यंग व्यासचे प्रमुख बाबा गुरिंदर सिंह ढिल्लों यांच्यासाब्sातचे छायाचित्र ट्विट केले. या ट्विटसोबतच पूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
डेरा व्यासचा मोठा प्रभाव
पंजाबमध्ये राधा स्वामी डेऱयाचा मोठा प्रभाव आहे. पंजाबसह अनेक राज्यांमध्येही डेऱयाचे अनुयायी आहेत. डेरा व्यासचे अनुयायी अनेक मतदारसंघांमधील निकालाला प्रभावित करण्याची शक्ती बाळगून आहेत.
डेऱयाची राजकीय शाखा मजबूत
बाबा जैमल सिंह यांनी 1891 मध्ये डेरा व्यासची स्थापना केली होती. डेरा तळागाळाशी जोडला गेलेला असून आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेला आहे. परंतु डेऱयाची राजकीय शाखा मजबूत आहे. उघडपणे कधीच राजकारणाबद्दल बोलले जात नाही आणि घोषणा देखील होत नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मोहिंदर सिंह केपी हे देखील डेरा व्यासचे अनुयायी आहेत. चरणजीत सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री झाल्यावर दोनवेळा डेरा व्यासला भेट दिली आहे. अकाली नेते विक्रम मजीठिया देखील तेथे जात असतात.
94 मतदारसंघांमध्ये प्रभाव
पंजाबमध्ये सक्रीय डेऱयांबद्दल कुठलीच शासकीय आकडेवारी नाही, परंतु एका अनुमानानुसार पंजाबमध्ये 9 हजार शीख आणि 12 हजार बिगरशिख डेरे आहेत. यातील सुमारे 300 डेरे महत्त्वाचे असून त्यांचा पंजाबसह हरियाणातही प्रभाव आहे. यातील 12 डेऱयांचे एक लाखांहून अधिक अनुयायी आहेत. डेरा व्यास त्यांच्यापैकी एक आहे.









