ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती लागला आहे. एनआयएने यासंदर्भात गृहमंत्रालयाला पत्राद्वारे कळवल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.
एनआयएच्या हाती आलेल्या ई-मेलनुसार मोदींना जीवे मारण्याचा कट रचला जात आहे. ylalwani12345@gmail.com या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर हा मेल आला आहे. हा ई-मेल 8 ऑगस्टला रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये ‘Kill Narendra Modi’ असे म्हटले आहे.
या ई-मेल संदर्भात चौकशी करण्यात येत असून, सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा व्यवस्थेला अलर्ट देण्यात आला आहे. मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.









