पेडणे/ ( प्रतिनिधी )
गेली अनेक वर्ष राम मंदिराचा विषय प्रलंबित होता, हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे सुटला. आता देशात रामराज्य येणार आहे याची सर्व देशवासियांना तशीच गोमंतकीय जनतेला आतुरतेने वाट पाहत आहे. आज पत्रादेवी येथे श्रीरामरथाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. गोव्यात विविध ठिकाणी या रथयात्रेचे स्वागत होणार असून सर्व भाविकांनी रामरथाचे स्वागत करुन रामपादुकांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन गोवा भाजाप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनी पत्रादेवी येथे केले.
शनिवारी सकाळी पत्रादेवी येथे रामरथ आल्यानंतर या रथाचे स्वागत पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, सदानंद शेठ तनावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, माजी आमदार दयानंद सोपटे, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे यांनी केले.
यावेळी सौ. पल्लवी प्रविण आर्लेकर, सौ. सिद्धी जीत आरोलकर, पार्सेच्या माजी सरपंच प्रगती सोपटे, नयनी शेटगावकर, माजी जिल्हा पंचायतसदस्य तुकाराम हरमलकर, रमेश सावळ, सरपंच निशा हळदणकर आदी मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्ते तसेच विविध पंचायतीचे सरपंच उपस्थित होते.
आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर होत आहे. गोमंतकीय जनतेच्या मनात राममंदिराबाबत असलेली आस्था आता मूर्त स्वरुपात येत आसल्याचा आनंद होत आहे. आम्हाला भाग्य मिळाले या रामरथाचे स्वागत करण्याचे त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े म्हणाले की, गोव्यातील जानता राममंदिर व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे वाट पाहत होती ते त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. याचा आनंद होत आहे. हिंदू धर्मियांचा एक स्वप्न होतं की अयोध्या राम मंदिर व्हावा आणि यासाठी केले अनेक वर्ष हा विषय न्यायालयाच्या आणि अन्य कारणामुळे प्रलंबित राहिला होता मात्र मोदीच्या नेतृत्वामुळे आज हा विषय तडीस जात आहे. गोव्यात आज या रामरथाने प्रवेश केला आहे. या रथाचे गोव्यातील भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवान यावेळी डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी केले.









