ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. यामध्ये कोरोना च्या अंधकरापासून प्रकाशित होण्यासाठी 5 एप्रिल ला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट बंद करून घरोगरी दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर लेखक चेतन भगत यांनी आपल्या ट्विटर वर इमोजी शेअर करत सरकार वर टीका केली आहे. चेतन भगत यांनी आपल्या ट्विटमध्ये घंटा आणि एक दिवा यांचा ईमोजी केला आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आजच्या आवाहनानंतर सोशल मीडियावर काही जणांकडून टीका तर काही जणांकडून समर्थन केले जात आहे. तर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.









