आयआयएमच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचं मोदींना पत्र
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून देशात धर्म आणि धर्मांतर या विषयावरुन बराच तणाव निर्माण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सामाजिक सलोख्याविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र आयआयएममधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मोदींना पाठवले आहे.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी धर्मांतरच्या निमीत्ताने केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरल होते. सूर्या यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चनांचं धर्मांतर करण्याच्या केलेल्या विधानावरून बराच वाद झाला होता. देशातील काही भागात चर्चवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या, तर हरिद्वारमध्ये धर्मसंसदेमध्ये द्वेषपूर्ण भाषणं करण्यात आली असल्याची भूमिका पत्रामध्ये सह्या करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यासंदर्भात स्पष्ट केली.
हे संदर्भ घेत आयआयएमच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीत चिंता व्यक्त केली आहे.देशातील राजकीय पक्ष ही या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात.यावर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत पत्र लिहून आपलं दु:ख मोदींना एक विनंतीवजा आवाहन केलं आहे.
या पत्रात त्यांनी देशातील वाढत्या तणापूर्ण वातावरणावरुन पंतप्रधान मोदी यांचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना अधिक बळ देत आहे आणि त्यातून आपल्या देशाच्या एकता आणि सामाजिक सलोख्यालाच तडा जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले आहे.