ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
जगभरात थैमान घालणाऱया कोरोनाने देशातही थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 1029 वर पोहचली असून, आतापर्यंत 19 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला संबोधित करणार आहेत.
आज ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी जगभरात फैलावत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सकाळी अकरा वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी ऍपवर प्रसारित होणार आहे.
दरम्यान, नव्या वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजचे हे जनतेला तिसरे संबोधन असणार आहे. आज मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.