मुंबई /ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या रश्मी ठाकरे यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. महराष्ट्र सरकार नागरिकांना मास्क घालण्याचे, आरोग्य़ाची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








