बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक राज्यातील दोन शहरांमध्ये कोविड लसीकरण मोहीम राबविणार आहेत. कर्नाटकात एक बेंगळूर आणि दुसरे हुबळीमध्ये कोविड लसीकरण मोहीम राबविण्याची योजना आखली आहे.
शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी पंतप्रधान मोदी देशभरातील ५ हजार ठिकाणी लसीकरणावर नजर ठेवतील, त्यापैकी २५५ कर्नाटकमध्ये आहेत.
दरम्यान लस वितरणासंदर्भात पंतप्रधान सोमवारी दुपारी चार वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संबोधित करतील. मंत्री सुधाकर यांनी आतापर्यंत केंद्र सरकारने आम्हाला कळविले आहे की कर्नाटकात लवकरच १३.९० लाख लस मिळणार आहेत.
केंद्रीय मंत्री सर्व राज्यांतील आरोग्य मंत्री आणि इतर उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतील. मंत्री सुधाकर यांनी लस वितरणासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या जातील असा आम्हाला विश्वास आहे. दरम्यान लस किती वेळा वापरली जाईल, त्याचे प्रमाण किती असेल इत्यादी लस मिळाल्यानंतरच कळू शकेल.