ऑनलाईन टीम / तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी पुणे मेट्रोचं पहिलं तिकीट मोबाईल द्वारे काढलं. यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी नव्याने उद्घाटन झालेल्या प्रकल्पांविषयी समाधान पवार म्हणाले कि, पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”, असं अजित पवार म्हणाले.
यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसात केलेले वादग्रस्त वक्तव्याचा महाराष्ट्रातील भाजप वगळता इतर पक्षांनी खरपुस समाचार घेतला आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच कोश्यारींना फचकारल्याने भाजप या साऱ्याकडे कसे पाहते हे महत्त्वाचे ठरणार आहे.