राष्ट्रवादीचे बळीराम काका साठे, जि. प.सदस्य उमेश पाटील यांचा बहिष्कार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत सांगोल्याचे एडवोकेट सचिन देशमुख यांनी स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मांडला. यामध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्मयांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. या ठरावाला ज्ये÷ सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचं सचिन देशमुख यांनी सांगितले. यासह विविध विषयावर वादळी बैठक झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता उमेश पाटील यांनी बहिष्कार घातला.
दरम्यान यापूर्वी 2 ऑनलाईन सभा सदस्यांनी गोंधळ घातल्याने तहकूब झाल्या होत्या. त्यानंतर सर्व पदाधिकारी सदस्यांनी यावर तोडगा म्हणून सभेच्या एक दिवस अगोदर आढावा बैठक घ्यायची त्यात विषयावर चर्चा करायची असे ठरले होते. त्याप्रमाणे बुधवारी दोन सत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली. त्याच दिवशी ऑफ रेकॉर्ड विषय मंजूर झाले? त्यानंतर गुरुवारी दुपारी ऑनलाइन सभा झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प .अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते. सर्व नियोजन बद्ध झाल्याने एकाही सदस्यांनी यावेळी विरोध केला नाही. या सभेमध्ये गोंधळातच 26 विषयांना मंजुरी दिली गेल्याची माहिती मिळाली सभाही ऑनलाइन होती, मात्र या सभेत बरीच टिंगल-टवाळी दिसून आली. खाजगी मध्ये ज्या पद्धतीने चर्चा होतात तशा चर्चा ऑनलाईन सभेमध्ये ऐकण्यास मिळाल्या. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी एका महिला सभापती यांना बोलूच दिले नाही, त्या आमचा विषय प्रोसिडिंग मध्ये यावा म्हणून ओरडत होत्या, तुम्हाला काल बोलू दिले आज अजिबात बोलायचे नाही म्हणून सरळसरळ दम भरला.
सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, मदन दराडे, आनंद तानवडे, सभापती अनिल मोटे हे सलग बोलत होते. त्यांना मात्र बोलताना थांबवण्याची हिम्मत अध्यक्ष कांबळे यांच्यात दिसली नाही, हे अध्यक्ष पदाचे दुर्दैव होते. तानवडे आणि दराडे यांनी सभेला जॉईन झालेल्या अरुण तोडकर यांची सभेतच टर उडवली.
माळशिरसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे हे या सभेला सुद्धा आक्रमक दिसून आले, त्यांनी महिला व बालकल्याण विभागातील त्या लोंढे कर्मचाऱयांच्या मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यांच्यात आणि अध्यक्षाच्या मध्ये काही वेळ तू तू मै मै झाली, सभापती अनील मोटे हेसुद्धा या सभेत आक्रमक दिसले. त्यांनी विशेष करून अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप करणारे भारत शिंदे बैठकीत मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांच्यासोबत बैठकीला बसले होते.








