वार्ताहर / दिघंची
दिघंची येथील पंढरपूर – मायणी या महामार्ग वरील देवस्थान वेताळबा ते संगम मंगल कार्यालय या रस्त्याची उंची कमी करा अशी मागणी या रस्त्यालगत राहणार या नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या रस्त्यांमुळे रस्त्याची उंची वाढत गेली परिणामी घरे रस्त्याच्या खाली राहिले आहेत. त्यामुळे, सांडपाणी तसेच पावसाचे पाणी यांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याची उंची कमी करण्यासाठी नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
पंढरपूर मायणी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे ठिकाणी रस्त्यासाठी खोदकाम देखील केले आहे. मधील वेताळबा देवस्थान ते संगम मंगल कार्यालय याठिकाणी रस्त्याची उंची घरापासून सात ते आठ फूट आहे त्यामुळे नागरीकांचा सांडपाण्याचा देखील प्रश्न उभा राहिला आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे या रस्त्याची उंची कमी करण्याची मागणी केली आहे. तसेच दक्षिण बाजूला रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली आहे तर उत्तर बाजूला रस्त्याची रुंदी एका इंचाने देखील वाढवण्यात आली नाही त्यामुळे दोन्ही बाजूला समान रूंदी वाढवण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे.
या रस्त्याच्या बरोबर मध्यभागी दिघंची शहराला पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन आहे त्यामुळे भविष्यात पाईप लाईन लिखित झाल्यास संपूर्ण प्रस्ताव करावा लागेल याचादेखील विचार शासनाने करावा अशी मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश साळी यांनी सांगितले की सदर रस्त्याची उंची वाढविल्यास याचा फटका रस्त्यालगत असणार्या तीनशे ते चारशे कुटुंबांना बसणार आहे या सर्वांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा व रस्त्याची उंची कमी करावी अन्यथा आम्ही सर्व नागरिक आमरण उपोषणाला बसणार आहे.
Previous Articleजगभरातील कोरोनाबळींची संख्या 6 लाखाच्या उंबरठ्यावर
Next Article गोकुळची दूध खरेदी दरात कपात








