प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूर शहरामध्ये कोरोना बाधित रूग्णांचा संसर्ग वाढत आहे. अशातच पालिकेच्यावतीने शहरातील लक्षणे नसलेल्या 20 कोरोनाबाधित रूग्णांवर घरातच विलगकरून उपचारपध्दती सुरू करण्यात आली आहे. यासाठी पालिकेकडून एक कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली.
पंढरपूर शहरात कोरोनाबाधिताची आकडेवारी सहाशे पार झाली आहे. अशातच प्रत्यक्ष उपचारात असणारे रूग्ण हे तीनशेपार आहे. यामध्येच शहरामधील कोरोनाची कुठल्याही प्रकारची लक्षण नसणारी. पण कोरोनाबाधित असलेल्या रूग्णांची संख्या देखिल लक्षणीय आहे. अशा रूग्णांवर आता त्यांच्याच घरांमधे उपचार सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित रूग्णांवर त्यांच्याच घरामध्येउपचार सुरू करण्यापूर्वी. पालिकेच्यावतीने सदरच्या कोरोबाधित रूग्णांच्या संपूर्ण घराची पाहणी पालिकेच्या वतीने होत आहे. सदर रूग्णांचे घर हे संपूर्णपणे अलगीकरणाच्या दृष्टीने योग्य आहे का ? यांची खात्री पटल्यावर संबधित रूग्णांस त्यांच्याच घरात अलग करण्यात येते आहे. विशेष म्हणजे लक्षणे नसलेला कोरोबाधित रूग्ण घरात विलग झाल्यावर त्यांच्यासाठी एका विशेष डॉक्टरची देखिल नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच संबधित रूग्ण आणि त्यांच्या कुंटंबियांची देखिल काळजी पालिकेच्या नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे.
पालिकेमध्ये काही दिवसापूर्वी आ. प्रशांत परिचारक यांनी घरांतच रूग्णांवर उपचार करा. अशा प्रकारच्या बैठकीमध्ये सुचना दिल्या होत्या. यानंतर नगराध्यक्षा साधना भोसले तसेच मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी कंट्रोल रूम तयार केले आहे. तसेच मुख्याधिकारी यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करून कोराबाधित रूग्णांवर घरांमधेच उपचारपध्दती सुरू केली आहे.
घरामध्येच लक्षणे नसलेल्या रूग्णांवर उपचार झाले. तर कौटुबिंक वातावरणामध्ये संबधित रूग्ण लवकर कोरोनामुक्त होईल. तसेच संबधित रूग्णांची साखळी तोडण्यास देखिल अधिकची मदत होणार आहे. असे यानिमित्ताने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








