सांगली \ ऑनलाईन टीम
यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी सोहळा रद्द करून याही वर्षी बसमधून वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोजक्या आणि मानाच्या पालख्यांना सरकारने वारीसाठी परवानगी दिली आहे. पण पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही असून याप्रकरणी वारकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील पुढे आले आहेत. त्यांनी पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी सांगलीचे जिल्ह्याधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल असं वक्तव्या त्यांनी केले आहे.
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन पायी वारीच्या मागणीचे निवदेन दिले आहे. या भेटीदरम्यान संभाजी भिडे यांनी एक अजब वक्तव्य केले त्यामुळे ते चर्चेत आले. संभाजी भिडे म्हणाले की, पंढरीची आषाढी वारी झाल्यामुळेच देशातील नव्हे तर जगातील कोरोना आटोक्यात नाही तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्या तर हे विघ्य नष्ट होईल. आपल्या सगळ्यांचा वाटतं, कोरोनामुक्त हिंदुस्थान व्हावा आणि ते घटणार. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी.
संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्या करणारे लाखो वारकरी असून वर्षानुवर्षे ही परंपरा सुरु असल्याचं म्हटलं आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु वर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत, असंही त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे. चर्चेचे निमित्त करून केवळ १०० जणांना घेवून पालख्या निघाव्यात असं आश्वासन दिले होतं. प्रत्यक्षात मात्र १०० जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
यंदा कोरोना अनुषंगाने सर्व १० पालख्यांना वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील देहू आणि आळंदीमधील पालखीच्या प्रस्थानासाठी १०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित ८ पालख्यांना प्रत्येकी ५० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पण या वाऱ्या पायी होणार नसून एसटीने होणार आहे, याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








