प्रतिनिधी/पंढरपूर
पंढरपूर शहर आणि परिसरात 7 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या सात दिवसात कोरोनाची साखळी संपुष्टात आली नाही. तर आणखी तीन दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
पंढरपूरमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आजमितीला पंढरपुरातील कोरोनाचा आकडा 585 पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये 273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 295 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी आणि सोलापूर शहरांमध्ये देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करण्यात आले होते. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देखील लॉकडाऊन हे सात दिवसांसाठी करण्यात येणार आहे.
पंढरपुरातील लॉकडाउनच्या काळामध्ये केवळ हॉस्पिटल, मेडिकल दुकाने आणि दूध व्यवसाय सुरू असतील. बाकी इतर सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. त्यामुळे शहरातील वाढता कोरोनाचा पादुर्भाव पाहता. लॉकडाऊनमुळे कोरोनाला ब्रेक लागेल. असे या निमित्ताने बोलले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









