वृत्तसंस्था/ चंदीगड
2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फ्रांच्यायजीनी ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डॅमियन राईटची गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
45 वर्षीय डॅमियन राईटने 1997-98 साली आपल्या प्रशिक्षक कारकीर्दीला प्रारंभ केला. इंग्लीश कौंटी क्रिकेटमधील वुरसेस्टरशायर संघाचे ते पहिले प्रशिक्षक होते. डॅमियन राईटने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 123 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 2011 सालापर्यंत ते क्रिकेट क्षेत्रात विविध जबाबदाऱया सांभाळत होते. बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धेत राईट यांनी होबार्ट हरिकेन्स आणि मेलबर्न स्टार्स संघाबरोबर कार्यरत होते.









