ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पंजाब विधानसभेसाठी आता 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. सोमवारी निवडणूक आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंजाबमध्ये 177 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, 16 फेबुवारीला गुरू रविदास यांची जयंती आहे. पंजाबमधील अनुसूचित जाती समाजातील लोक गुरू रविदास जयंतीनिमित्त वाराणसीला जातात. त्यामुळे मतदान पुढे ढकलण्याची मागणी तीव्र होत होती. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यासाठी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये तारीख बदलण्याविषयी निर्णय घेण्यात आला.
पंजाबच्या निवडणुकांची अधिसूचना आता 25 जानेवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज 1 फेब्रुवारीपर्यंत दाखल केले जातील. 4 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.