ऑनलाईन टीम / चंदिगढ
गेले काही दिवस पंजाबच्या राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आला असून या घडामोडींना थांबवण्यासाठी थेट काँग्रेस हायकमांडला लक्ष घालणे भाग पडले. तरी ही काँग्रेसच्या गोटातील हालचाली कमी होत असल्याचे दिसत नाही. याच पार्श्वभूमवर मात्र पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पंजाबमधील २ किलोवॅटपर्यंत वीज वापर असणाऱ्या कुटुंबांचं वीजबिल माफ केलं जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हे वीजबील पंजाब राज्यशासन भरणार आहे. यामूळे पंजाब राज्यशासनाला जवळपास १२०० कोटी रुपयांचं वीज बिल भरावं लागेल. याशिवाय वीज बिल न भरल्यानं तोडण्यात आलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “पंजाबमधील गावांमध्येवीजेचा प्रश्न मुख्य आहे. ५३ लाख कुटुंबांना आपलं वीज बिल भरता आलेलं नाही. अधिकचे बिलं न भरल्यानं अनेक घरांमधील वीज मीटरची जोडणी तोडण्यात आलीय. मी त्यांची अडचण समजू शकतो आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे पंजाब सरकार या ५३ लाख कुटुंबांचं वीज बिल भरेल. यातील ७५ ते ८० टक्के वीज ग्राहक २ किलोवॅट वर्गातील आहेत. वीज जोडणी तोडलेल्या ठिकाणी पुन्हा वीज जोडणी दिली जाईल. तसेच त्यांच्या शेवटच्या वीज बिलाची काळजी आम्ही घेऊ.” असे ही म्हणाले. यामुळे पंजाबमधील मध्यमवर्गींयांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Previous Article“माझा मोदींबाबत हा आक्षेप…” केरळ दौऱ्यावर राहुल गांधींचा घणाघात
Next Article जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठांची’








