- मागील 24 तासात 1,475 नवे बाधित ; 38 मृत्यू
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 1,475 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 38 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 01 हजार 475 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 751 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,01,475 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 283 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 137 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण ॲक्टिव्ह
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 54 लाख 27 हजार 097 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 12 हजार 616 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 272 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 26 जण व्हेंटिलेटरवर आहेत.