ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाब विधानसभेचे उपसभापती अजायब सिंह भट्टी आणि कॅबिनेट मंत्री गुरुप्रीत कांगड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय कांगड यांची सून हरमनवीर जस्सी कांगड यांना देखील कोरोना चा संसर्ग झाला आहे.
हरमनवीर कॉपरेटिव बँक भटिंडाची चेअरमन आहे. यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची कोरोनाची चाचणी केले जात आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अजायब सिंह आणि कांगड यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली आहे.
उपसभापती अजायब सिंह भट्टी यांनी स्वातंत्र्य दिनी फरीदकोट येथील नेहरू स्टेडियममध्ये ध्वजारोहण केले होते. कार्यक्रमाच्या वेळी ते अनेक ऑफिसर आणि नेत्यांना भेटले होते तर काही नेत्यांच्या घरी देखील गेले होते. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने सिव्हिल रुग्णालय भटिंडा येथे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
कांगड हे 15 ऑगस्ट रोजी मानसा येथे होते. ध्वजारोहणानंतर त्यांनी एका स्मार्ट स्कूलचे उद्घाटन केले आणि त्यानंतर ते काही नेत्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामूळे त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कांगड यांच्या सूनेचे रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.









