ऑनलाईन टीम / दैनिक तरुण भारत
हरियाणातील अंबाला शहरात शहजादपूर परिसरातील जंगलात बेगामा नदीजवळ शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी रोजी तब्बल २३० बॉम्ब सापडले असुन. हे बॉम्ब कोणत्या अवस्थेत आहेत. त्यांची स्थिती कोणती आहे ? आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत याचा तपास पोलीस घेत आहेत. या पार्श्वभुमीवर बॉम्बची माहिती मिळताच पोलिस आणि लष्कर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसर सील केला आणि लोकांच्या हालचालींवर बंदी घातली. लष्कर आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत असुन हे बॉम्ब खूप जुने गंजलेल्या अवस्थेत आढळले असुन ते जमीनीत गाडलेल्या अवस्थेत होते.
या बाबत माहीती मिळताच ग्रामस्थांनी शुक्रवारी अंबाला पोलिसांना दिली. यामुळे पोलिस प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांच्या पथकाने बॉम्बसदृश वस्तू पाहिल्यानंतर तातडीने अंबाला येथील लष्कराला माहिती दिली.
सद्या बॉम्ब निकामी पथकालाही घटनास्थळी पाचारण केले आहे. त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बॉम्ब कुठून आले, याचा तपास सुरू आहे आणि ते कधीपासून इथे जमिनीत गाडले गेले ? अशा अनेक पैलूंवर तपास सुरू आहे. हे बॉम्ब सक्रिय आहे की नाही ? त्याचाही तपास सुरू आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब आढळल्याने लष्कर आणि पोलिसांनी हा संपूर्ण परिसर तातडीने सील केला आहे. यामुळे तेथून आजूबाजूच्या गावातील लोकांची ये-जा बंद झाली असुन या परिसरात आणखी बॉम्ब सापडण्याची भीती आहे.









