ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमधील अमृतसर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या मेसवर झालेल्या गोळीबारात चार जवान ठार झाले असल्याचे वृत्त आहे. तर या हल्ल्यात अनेक जखमी झाले आहेत. मेसमध्ये जेवणासाठी एकत्र जमले असता हा हल्ला झाला आहे. यावेळी जवानांना एकाच वेळी टार्गेट करत गोळीबार केला आहे. रविवारी अमृतसरमधील खासा गावातील बीएसएफच्या मेसमध्ये हा प्रकार घडला. एका कॉन्स्टेबलनंच हा अंधाधुंद गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी ६ मार्च रोजी सकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, चार जवानांचे पार्थीव रुग्णालयात आणण्यात आलं आहे. या हल्ल्यात इतर अनेक जवान जखमी झाले आहेत. पण अद्याप बीएसएफच्यावतीनं या घटनेवर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.