ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ३७ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनेही देशात भीतीचे वातावरण निर्माण केलं असून ओमिक्रॉन बाधितांची संख्याही वाढत आहे. त्यातच पंजाबच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात एकाच वेळी तब्बल १०० विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सोमवारी पतियाळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली असता १०० विद्यार्थ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ खोल्या खाली करण्यास सांगितले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, पंजाबमधील ही दुसरी शिक्षण संस्था आहे जी करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. गेल्या आठवड्यात, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पतियाळा येथील सुमारे ९३ विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय.
.