ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने एका रात्रीत अबकारी करात कपात करुन पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. त्यानंतर आता अधिक स्वस्ताईसाठी भाजपशासित राज्यांनीही मूल्यवर्धित कर कमी केल्यामुळे संबंधित राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी कपात झाली आहे. पंजाब सरकारनेही पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त केले असून, नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी याबाबत घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात 5 ते 10 रुपये कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनीही गुरुवारी मूल्यवर्धित कर 2 ते 7 रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये इंधानाचे दर आणखी स्वस्त झाले आहेत. यामध्ये गुजरात, उत्तरप्रदेश, गोवा, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये इंधनाचे दर कमी होऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न आता वाहनधारक उपस्थित करत आहेत.









