काळापैसा पकडण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन टोल फ्री क्रमांक जारी
पंजाब निवडणुकीत काळय़ा पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग सतर्क झाले आहे. प्राप्तिकर विभागाने याकरता नियंत्रण कक्ष स्थापन केला असून टोल फ्री क्रमांक 180003451545 जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन करून कुणीही काळय़ा पैशाबद्दल माहिती देऊ शकतो. प्राप्तिकर अधिकाऱयांनुसार माहिती देणाऱयाचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.
नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत राहणर आहे. कुठलाही व्यक्ती रोकड किंवा अन्य मौल्यवान वस्तूद्वारे निवडणुकीला प्रभावित करत असल्यास त्याची माहिती दिली जाऊ शकते, असे प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
80 अधिकारी तैनात
पंजाबच्या प्रत्येक जिल्हय़ात प्राप्तिकर विभागाकडून पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती मिळताच प्रारंभिक तपासानंतर पथक त्वरित कारवाई करणार आहे. पंजाबमध्ये पूर्वीच 80 अधिकारी आणि निरीक्षकांना तैनात करण्यात आले आहे. प्राप्तिकरचा नियंत्रण कक्ष जिल्हा निवडणूक अधिकाऱयासोबत मिळून काम करणार असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.
विमानतळ, रेल्वे, बँकांवरही नजर
सर्व विमानतळांवर एअरपोर्ट इंटेलिजेन्स युनिटला सक्रीय करण्यात आले आहे. रोख रकमेच्या हवाईमार्गाने होणाऱया वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी प्राप्तिकर पथके पूर्णपणे तयार आहेत. रेल्वेद्वारे देखील यावर नजर ठेवली जाणार आहे. याकरता रेल्वे अधिकाऱयांसोबत प्राप्तिकर विभाग संपर्कात आहे. बँकेतून रोख रक्कम काढून घेण्याच्या मर्यादेच्या दृष्टीनोकातून प्राप्तिकर विभाग नजर ठेवेल. संशयास्पद व्यवहार झाल्यास त्याचा तपास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिज्ञापत्रांची होणार पडताळणी
प्राप्तिकर संचालनालय उमेदवारी अर्जावेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करणारी आहे. उमेदवारांची मालमत्ता आणि कर्जांची पडताळणी होणार आहे. जर कुठे गडबड दिसून आल्यास यासंबंधी त्वरित निवडणूक आयोगाला माहिती दिली जाईल. निवडणूक खर्चावरून उमेदवारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यासंबंधी आयोगाला कळविले जाणार असल्याचे प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.









