ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 1,071 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 16 हजार 213 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,16,213 रुग्णांपैकी 97 हजार 777 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 14,935 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 19 लाख 02 हजार 976 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 14 हजार 935 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 318 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 59 जण व्हेंटिलेटरवर आहेत.









