ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच शुक्रवारी पंजाब मध्ये 43 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 2201 झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यात कोरोनामूळे 44 वा मृत्यू झाला आहे. तर अन्य 23 नवे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जे अन्य राज्याशी संबंधित आहेत. शुक्रवारी कपूरथला मधील 3 रुग्ण बरे देखील झाले आहेत. त्यामुळे राज्यात आता पर्यंत 1949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासात अमृतसर 12, जालंधर मधील 8, पठाणकोटमधील 5, बठिंडा आणि लुधियाना मधील 4 – 4, गुरुदासपुर व मोहलीतील 3 – 3, आणि पटियाला व रोपड मध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यात आता पर्यंत 81 हजार 21 रुग्णांची टेस्ट करण्यात आली आहे. तर राज्यातील विविध रुग्णालयात 206 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एक रुग्ण ऑक्सिजन वर आणि एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.









