नवी दिल्ली/प्रतिनिधी
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नवज्योतसिंग सिद्धू (navjyot singh sidhu ) यांनी पंजाब प्रदेशाध्यक्ष (punjab congress president) पदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi President of Indian National Congres) यांच्याकडे हा राजीनामा पाठवला आहे. मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही, असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं असलं तरी काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल्याने ते काँग्रेसमध्येच राहणार असून पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
गेल्या काही दिवासांपासून पंजाबमधील (punjab) राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Former CM Captain Amarinder Singh) आणि पंजाब प्रदेश काँग्रेस (Congress) अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली. काही दिवसांनी या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचं देखील दिसून आलं होतं. मात्र, अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली. पण ही समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (union home minister amit shah) आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ( j p nadda bjp president) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.