ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 496 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 93 हजार 572 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 801 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 5,93,572 रुग्णांपैकी 5 लाख 72 हजार 008 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 923 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये सद्य स्थितीत 5 हजार 641 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये जालंधरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 477 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. लुधियाना 476, पटियाला 290 तर अमृतसरमधील 642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.









