ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांनी 2.17 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यातच मंगळवारी 2,274 नव्या रुग्णांची नोंद झाली. 53 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 17 हजार 663 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात 1,426 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,17,663 रुग्णांपैकी 1 लाख 91 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 435 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 19,403 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये सद्य स्थितीत 19 हजार 403 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये जालंधरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 2629 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सास नगर 2561, लुधियाना 2167, पटियाला 2064 तर अमृतसरमधील 1805 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.









