ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह बहुतांशी भागावर तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. यानंतर तालिबान्यांनी आता त्याचा मोर्चा अफगाणिस्तानाच्या उर्वरित भागांकडे वळवला आहे. असे भाग जे अद्याप तालिबानच्या ताब्यात नाहीत. त्यापैकी एक म्हणजे पंजशीर.
या भागाकडे आता शेकडो तालिबान्यांनी कूच केली असल्याची माहिती रविवारी तालिबानकडून देण्यात आली. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर सरकारमधील अनेक नेते, अधिकारी, तालिबानविरोधी नागरिकांनी पंजशीरकडे धाव घेतली. काबूलच्या उत्तरेला असणारा हा भाग तालिबान विरोधी म्हणून ओळखला जातो.
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच नागरिकांना त्रास देणे सुरु केले आहे. यामुळे अनेक अफगाणि नागरिक देश सोडून बाहेर जाण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत. प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या, राजदूतांच्या सुरक्षेसाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
राज्यातल्या स्थानिक प्रतिनिधींनी शांततेत या भागाचा ताबा आमच्याकडे दिला नाही त्यामुळे शेकडो मुजाहिदीन आता पंजशीरचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









