ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तान काबीज करुन सत्ता ताब्यात घेणाऱ्या तालिबानला पंजशीर प्रांतावर ताबा मिळविण्यास अपशय आले आहे. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न सुरू असून, वारंवार तालिबान घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. मंगळवारी रात्री देखील तालिबानने पंजशीर प्रांतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंजशीरचं संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सने 350 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर 40 हून अधिक तालिबान्यांना कैद केले आहे.
पंजशीर प्रांत तालिबान्यांना अद्याप ताब्यात घेता आला नाही. या प्रांताचे संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सच्या हाती अमेरिकेने अफगाणिस्तानात सोडलेली अमेरिकन वाहने आणि हत्यारे लागली आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री पंजशीर प्रांतात घुसखोरी करणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांना नॉर्दर्न अलायन्सने चोख प्रत्युत्तर देत 350 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर 40 हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना कैद केले आहे.









