काबुल: तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. परंतु पंजशीर खोऱ्यावर त्यांना ताबा मिळवता आलेला नव्हता. आता तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (एनआरएफए) चा पराभव केल्याचा दावा केल्यावर शुक्रवारी काबूलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अस्वाका या अफगाण वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान तालिबान शुक्रवारी सरकार स्थापन करणार होत. पण अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना तालिबानने शुक्रवारी लांबणीवर टाकली असल्याचं वृत्त आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सरकार स्थापना आता शनिवारी करण्यात येणार आहे. दरम्यान २० वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबानने शुक्रवारी पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. माध्यमांच्या वृत्तांमध्ये पंजशीर देखील तालिबानच्या ताब्यात गेले आहे दावा केला जात आहे. त्यानंतर स्वतःला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेहसुद्धा पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त समोर आलं असून याबाबत अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
अमरुल्ला सालेह यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगितले आहे. सालेह पंजशीर खोऱ्यात असून आणि नॉर्दन अलायन्स दलाचे कमांडर आणि राजकीय व्यक्तींसोबत असल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. अमरुल्ला सालेह यांनी शुक्रवारी सर्व प्रसारमाध्यमांचे वृत्त फेटाळून लावले आहेत.
Previous Articleनेमबाजीत मनीषला ‘सुवर्ण’; तर सिंघराजची ‘रौप्य’पदकाची कमाई
Next Article चार्टर्ड अकौंटंट रमाकांत वेर्लेकर निवर्तले









