काबुल: तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान (एनआरएफए) चा पराभव केल्याचा दावा केल्यावर शुक्रवारी काबूलमध्ये जोरदार गोळीबार केला होता. पण अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणाऱ्या अमरुल्ला सालेह स्वतः पंजशीरमधल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. अमरुल्ला सालेह यांनी आपण देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगत सालेह पंजशीर खोऱ्यात असून आणि नॉर्दन अलायन्स दलाचे कमांडर आणि राजकीय व्यक्तींसोबत असल्याचे सालेह यांनी म्हटले आहे. तसेच तालिबान्यांनी पंजशिरवर ताबा मिळवला हे प्रसारमाध्यमांचे वृत्त फेटाळून लावले होते. आता बंडखोर गटाने पंजशीरमध्ये तालिबानच्या ७०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान तालिबानला अद्यापही अफगाणिस्तानातला शेवटचा प्रांत पंजशिरवर ताबा मिळवता आलेला नाही. पण तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तान या दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. तालिबानने पंजशीर प्रांताची राजधानी बझारकमध्ये घुसल्याचा दावा केला आणि प्रांतीय गव्हर्नर कार्यालयावर हल्ला केला, तर नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानने सांगितले की तालिबानी दहशतवाद्यांना कपिसा प्रांत आणि पंजशीरच्या सीमेवर परत ढकलले गेले आहे.
अब्वाका न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तालिबानने असा दावा केला आहे की त्यांनी पंजशीरच्या शुतुल जिल्ह्यावर कब्जा केल्यानंतर अनबा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी सांगितले की, खिंज आणि उनाबाह जिल्ह्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यामुळे तालिबानी सैन्याने प्रांताच्या सात जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांचे नियंत्रण मिळवले आहे.”मुजाहिद्दीन तालिबान लढाऊ केंद्र प्रांताच्या दिशेने पुढे जात आहेत,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
Previous Articleबाधितवाढ चारशे-पाचशेवर स्थिर
Next Article जलसमाधी आंदोलन : राजू शेट्टी नृसिंहवाडीकडे मार्गस्थ









