वार्ताहर / हुपरी
पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल-हातकणंगले या वसाहती मधील कोल्हापूर ऑक्सिजन या कंपनीमधून चार टन ऑक्सिजन भरून टँकर शिरोळ, मिरजमध्ये असलेल्या कोरोना केअर सेंटरला पुरवठा करण्यासाठी जात असताना सिल्व्हर झोनजवळ कालव्याच्या कडेला असलेल्या कठड्यास जोरदारपणे धडकून झालेल्या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून कोणतीही वित्तहानी झाली नाही. मात्र टँकरचा ऑक्सल पाटा तुटून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
कागल–हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कोल्हापूर ऑक्सिजन नावाची रनदेवाडी हद्दीत कंपनी आहे. त्या कंपनीतून कोरोना केअर सेंटर व मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. गुरुवार 6 रोजी चार टन ऑक्सिजन भरून कंपनीचा एम एच 09 — एफ एल 9921 या नंबरचा टँकर शिरोळ, मिरजमध्ये मागणी केलेल्या कोरोना केअर सेंटरला पुरवठा करण्यासाठी जात होता. टँकरचा चालक बेसावधपणे वाहन चालवत असताना सिल्व्हर झोनजवळ मोठा कालवा असल्याने कॉर्नर आहे. पंचतारांकित वसाहतीकडून येणारे वाहन गतिमान असेल तर धोका होण्याची दाट शक्यता आहे. ऑक्सिजनने भरलेला टँकरचा वेग चालकास आवरता आला नाही तो कालव्याच्या कडेला असलेल्या कठड्यास जोरदारपणे धडकाला मात्र कोणालाही इजा पोहचली नाही. वाहन चालक सुखरूप असून किरकोळ उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झालेल्या ठिकाणी कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीतील वरीष्ठ अधिकारी येऊन पहाणी केली असता कंपनीच्या टँकरचा ऑक्सल पाटा तुटला होता. वाहन चालकाने 200 फूट ब्रेक लावुन गाडी घसटत नेलेली दिसत होते. या अपघातात चालक सुखरूप असल्याचे समाधान व्यक्त केले. त्या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत त्यात अनेकांचा प्राण गेलेला आहे अशा ठिकाणी हा अपघात झाला होता. उपस्थित कंपनी अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती विचारले असता सांगण्यास टाळाटाळ करीत होते.