प्रतिनिधी / कोल्हापूर
आक्रोश मोर्चानंतर राज्य सरकारला पूरग्रस्त शेतकऱयांची दया आली नाही. याकडे जिल्ह्Îातील ंमंत्र्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे जलसमाधी आंदोलन हे होणार असा निर्धार साभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. 1 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली येथून जलसमाधी प्ररिक्रमेस प्रारंभ होणार आहे. पंचगंगा काठावरुन यात्र पाच सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दत्त महाराजांचे तिर्थक्षेत्र आणि महापुराची राजधानी नृसिंवाडी येथे पोहचेल. त्यानंतर कृष्णा पंचगंगाच्या संगमावर हजारे पूरग्रस्त शेतकऱयांसमवेत जलसमाधी घेणार आहे. अशी माहिती शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चामध्ये सरकारला 1 अठवडÎाचा वेळ दिला होता. मात्र काहीच ठोस भूमिका घेतली नाही. राज्य सरकारने पूरग्रस्तांना निर्णय घेऊन दिलासा द्यायला पाहिजे होता. अशी अपेक्षा होती. जिल्ह्यातील मंत्र्यांनीही चर्चा केली नाही. त्यामुळे पुरग्रस्ताच्या मागणीसाठी ठरल्या प्रमाणे 1 सप्टेंबरला जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करणार आहे. पंचगंगा नदीकाठावरुन ही परिक्रमा करणार असल्याचे शेट्टी यांनी संगितले.
केंद्र आणि राज्य सरकार आपआपले अपयश लवपण्यासाठी चढाओढ सुरु आहे. यासाठी सद्या नारायण राणे, उद्धव ठाकरे यांच्यातील वादाच्या चटपटीत बातम्या दिल्या जात आहेत. कोणी कोणाला कानाखाली मारणार म्हणतोय, कोणी कोणाला धमकी देतोय अशाच बातम्या सुरू आहेत. असा आरोप शेट्टी यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही पूरग्रस्तांना दिलासा देत नाहीत. सोयाबीन आयात करायला परवानगी देवून केंद्र सरकारने त्याच्या उद्योगपतीना खुश केले आहे. मात्र इकडे शेतकरी कंगाल झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हÎातील शेतकऱयाने गांजा उत्पदनास मागितलेली परवानगी गैर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करतो, त्यांना तालीबानी, आतंकवादी होण्यस प्रवृत्त करु नका असा इशारा शेट्टी यांनी दिला. शिवारात झाडाला लटकलेला शेतकरी पाहायचं की खुश असलेला शेतकरी पाहायचं आहे. हे एकदा सरकारने सांगावे. असे आवहनही शेट्टी यांनी केले.
अशी होईल जलसमाधी परिक्रमा
बुधवार 1 सप्टेंबर-प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे, निगवे भुय, शिये (मुक्काम)
गुरुवार 2 सप्टेंबर- शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक (मुक्काम)
शुक्रवार 3 सप्टेंबर- चोकाक, रुकडी, चिंचवाड, वसगडे, पट्टणकोडोली (मुक्काम)
शनिवार 4 सप्टेंबर-पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, तीन बत्ती, लाट (मुक्काम)
रविवार 5-सप्टेंबर-लाट, हेरवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी (तीन ला जलसमाधी )
Previous Articleधोनीची बॅट राजवर्धन पाटील यांचेकडून संग्रामसिंह यांना भेट
Next Article दापोलीत वाहक व चालक यांना बेदम मारहाण









