ऑनलाईन टीम / मुंबई :
नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात एका कंटनेरमधून 1 हजार कोटी रुपये किंमतीचे 191 किलो हेरॉईन जप्त जप्त करण्यात आले आहे. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स (DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून हे ड्रग्ज भारतात आणण्यात आले होते. आयुर्वेदिक औषधे असल्याचा बनाव तस्करांनी रचला होता. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्स, चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सरला अटक करण्यात आली आहे. यामधील दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे बेकायदेशीरपणे अंमलीपदार्थ आणण्याचा प्रयत्न तस्कर करतात. तिथूनच संपूर्ण देशात छुप्या मार्गाने ड्रग्जचे वितरण केले जाते.









