कोरोना काळात मास्क घालणं, सामाजिक दुरावा, वेळोवेळी हात धुणं या बाबी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. हे सगळं न्यू नॉर्मल आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठा गोष्टींचं पालन व्हायला हवं.कोरोना काळात अनेक जण याबाबत सजग झाले आहेत. सर्व नियमांचं कसोशीने पालन करत आहेत. मात्र काही जणांना कोरोनाची भीती वाटत नाही किंवा या आजाराचं, सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. असे लोक मास्क न घालता बिनधास्त फिरतात, सामाजिक अंतर राखत नाहीत तर काहींकडून अनावधनाने असं होतं. न्यू नॉर्मलचं कसोशीने पालन करणार्यांना या बाबी खटकतात. मग मास्क न घालणार्यांसोबत वाद होतो. प्रसंगी हा वाद विकोपाला जातो. प्रत्यक्षात कोरोना नियमांचं पालन करताना आपणही नम्र असायला हवं. समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देताना आपल्याकडून कोणताही उद्धटपणा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सध्याच्या परिस्थितीत कसं वागायला हवं याविषयी…
* तुम्ही व्यायामासाठी बाहेर पडल्यावर बागेतल्या बाकडय़ावर मास्क न घालता बसलेल्या लोकांना बघून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. त्यांच्यासाठी मनोमन प्रार्थना करून पुढे जा. वाद घालू नका. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. * सुपरमार्केटमधल्या कर्मचार्यांच्या नाकाऐवजी फक्त तोंडं मास्कने झाकली गेली असतील तर अशा वेळी काय करायचं हे आधीच ठरवून घ्या. तुम्ही याबाबत व्यवस्थापकाशी बोलणार की दुकानातून बाहेर पडणार याचा निर्णय घ्या.









