बेळगाव

गळतगा-भीमापूरवाडी, ता. चिकोडी येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून चार लाखांचा चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी न्यू गुड्सशेड रोड, चौथ्या क्रॉसवर खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विशाल हणमंत बेलेकर (वय 25) मूळचा राहणार गळतगा, सध्या राहणार तिसरा क्रॉस, ऑटोनगर असे त्याचे नाव आहे. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. पी. सरवगोळ, हवालदार शंकर शिंदे, व्ही. एन. कंटीकर, बी. ए. नौकुडे, डी. जी. हट्टीकर, एम. एस. हनगंडी, बी. पी. उज्जीनकोप्प, प्रकाश सनमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.








