गटारींची दुरवस्था – अस्वच्छता : उपनगरांमधील समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहराचा समावेश स्मार्टसिटी योजनेमध्ये झाल्यानंतर विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र ही कामे सर्व नागरी सुविधा उपलब्ध असलेल्या नगरांमध्ये राबविण्यात आल्यामुळे नागरी सुविधांचा अभाव असलेल्या परिसरात रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. न्यू गांधीनगर परिसरात गटारींची दुरवस्था आणि अस्वच्छता निर्माण झाली असल्याने या उपनगरांकडे कोणी लक्ष देईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
अनधिकृत वसाहत असा शिक्का मारून न्यू गांधीनगर आदांसह विविध उपनगरांमधील समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. न्यू गांधीनगर व उज्ज्वल नगरमध्ये एकूण 28 गल्ल्यांचा समावेश असून, ठिकठिकाणी खुल्या जागा व भूखंड आहेत. या खुल्या जागा व भूखंडावर सध्या कचऱयाचे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेकडून घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते, असे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात गांधीनगर परिसरात खुल्या जागांवर कचरा टाकला जात आहे. परिणामी दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. पण या परिस्थितीला जबाबदार कोण, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिकेकडून कचऱयाची उचल नियमित होत नसल्याने येथील रहिवासी खुल्या जागांवर कचरा टाकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे कचऱयाची उचल घरोघरी जाऊन होते का? याची चौकशी वरि÷ अधिकाऱयांनी करावी, अशी मागणी होत आहे.
न्यू गांधीनगर परिसरातील गटारीची स्वच्छता देखील केली जात नाही. यामुळे गटारी तुंबून सांडपाणी साचून रहात आहे. गटारीमध्ये ठिकठिकाणी कचरा आणि दगडमाती पडली असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थीत होत नाही. कांही गटारींचे बांधकाम व्यवस्थित झाले नसल्याने सांडपाणी साचून रहाते. परिणामी दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील विविध समस्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. येथील पाहणी करून महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.









