ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेनंतर अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातही कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असून, तो सर्वाधिक घातक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

ॲरोन डायमंड एडस् रिसर्च सेंटरचे व्यवस्थापक डॉ. डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी.1.526 असे या नव्या स्ट्रेनचे नाव असून, न्यूयॉर्कमधील 25 टक्के लोकांना या स्ट्रेनची लागण झाली आहे. हा स्ट्रेन वेगाने मानवी शरिरातील पेशींवर प्रभाव करतो. त्यामुळे मानसाच्या शारिरीक क्षमतेवर परिणाम होतो. तसेच कोरोनाच्या या नव्या प्रकारावर कोरोनाची कोणतीही लस प्रभावी ठरत नाही. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्येही अशा प्रकारचा स्ट्रेन आढळून आला आहे.
दरम्यान, कोरोनाचा हा स्ट्रेन नोव्हेंबरमध्येच न्यूयॉर्कमध्ये आढळला होता. मात्र, त्यावर संशोधन झाल्यानंतर यासंदर्भात माहिती समोर आल्याचे डेव्हिड यांनी सांगितले.









