माजी कर्णधार मिथाली राजचे भाकित
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये जेतेपदासाठी लढत होईल असे भाकित भारताची माजी कर्णधार मिथाली राजने केले आहे.
या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लड किंवा विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया उपांत्या फेरी गाठेल असेही तिने सांगितले. गट दोनमधून भारत आणि दक्षिण आफ्रिका तर गट एकमधून न्यूझीलंड आणि इंग्लड किंवा ऑस्टेलिया उपांत्य फेरीत प्रवेश मिळवतील. अलिकडेच मिथाली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेतील अंतीम सामना मेलबोर्नच्या मैदानावर 13 नोव्हेंबरला होणार आहे.









