वृत्तसंस्था/ ढाका
रविवारी येथे सुरू असलेल्या दिवस-रात्रीच्या तिसऱया टी-20 सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला विजयासाठी 129 धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 128 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 19.4 षटकांत 76 धावांत गुंडाळून 52 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश आता 2-1 असे आघाडीवर आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 128 धावा जमविल्या. निकोल्सने नाबाद 36, ब्लंडेलने नाबाद 30 ऍलेनने 15, यंगने 20, रविंद्रने 20 धावा जमविल्या. निकोल्स आणि बंडेल यांनी पाचव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी केली. बांगलादेशतर्फे सैफुद्दीनने 2 तर मेहदी हसन, रेहमान आणि मेहमुदुल्ला यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज झटपट बाद झाले. सलामीच्या मोहमद नईमने 13, लिटॉन दासने 15, मेहदी हसनने 1, शकीब अल हसनने 0, मेहमुदुल्लाने 3, अतिफ हुसेनने 0, एन. हेसनने 8, धावा जमविल्या. 15.4 षटकाअखेर बांगलादेशने 7 बाद 66 धावापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर एजाज पटेल (4) व मॅकोन्ची (3) यांच्या भेदक माऱयापुढे बांगलादेशचा डाव 19.4 षटकांत केवळ 76 धावांत आटोपला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 128, बांगलादेश 19.4 षटकात सर्व बाद 76. (एजाज पटेल 4-16, मॅकोन्ची 3-15









