ऑनलाईन टीम / पुणे : ज्यांच्यावर अन्याय होतो, जे वंचित आहेत,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारून न्यायासाठी गांधीवादी प्रेरणेने संघटित आणि अहिंसक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातून समाजाच्या धारणेची पुनर्रचना करणे हे ध्येय असले पाहिजे. गांधीजींचे जीवन कार्य त्या दृष्टीने अभ्यासले पाहिजे’, असे प्रतिपादन महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन – व्हायलन्स ‘चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी बिटझेल यांनी केले.‘गांधी आजच्या संदर्भात’ या विषयावर ‘महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन – व्हायलन्स ‘चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी बिटझेल यांच्या व्याख्यानाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला.डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, ‘ज्यांच्यावर अन्याय झाला , व्यवस्थेच्या रगाडयात जे मागे पडले, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपण मानवी प्रश्न, समस्यांकडे सहानुभूतीने पाहतो का, हेही तपासले पाहिजे.प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचा न्याय मिळालाच पाहिजे.प्रसारमाध्यमांचे त्यात चांगले योगदान असू शकते.गांधीजींच्या जीवनकार्याबद्दल बोलताना डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, ‘गांधीजींनी आयुष्यात अनेक प्रयोग केले. मोठया आव्हानांमध्ये मोठ्या संधी लपलेल्या असतात, हे त्यांना माहित होते. मी अहिंसेकडे प्रवास करतो, तेव्हा गांधींकडे प्रवास करतो, इतरांची सेवा हे गांधीजींनी आपले जीवन कर्तव्य मानले होते.
Previous Articleदुचाकी व कंटेनर अपघातात नरवेली येथील विद्यार्थी गंभीर जखमी
Next Article कासव संवर्धन केंद्र…छे छे मृत्यूकेंद्र!








